सेवा नरहरींची....
सेवा समाजाची...
The grand felicitation of teachers of Sonar community for the teacher's day
On receiving the justification of the teacher's day under the services of Narahari, on 9th September, 2018, Saint Narher Maharaj Mandir Nandkheda Road was felicitated on the behalf of the Narhariks by the teachers of Sonar Samaj. Santosh Shahane and Amol Kulthe (Pangarkar) performed the program,
शिक्षक दिना निमित्त सोनार समाजातील शिक्षकांचा भव्य सत्कार..
सेवा नरहरींची उपक्रमाअंतर्गत शिक्षक दिनाचे औचित्य साधुन आज दिनांक ९ सप्टेंबर २०१८ रोजी संत नरहरी महाराज मंदीर नांदखेडा रोड येथे सोनार समाजातील शिक्षकांचा सेवा नरहरींची यांच्या वतीने भव्य सत्कार झाला .. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शहाणे व अमोल कुलथे (पांगरकर) यांनी केले , प्रास्ताविकात समाजातील शिक्षक वर्गाने एकत्रित येवून विविध उपक्रमातून समाज उपयोगी प्रबोधन करुन समाजास एक उत्तम दिशा देण्याचे कार्य करावे असे सुचविले व आज पर्यंत सेवा नरहरींची उपक्रमाअंतर्गत झालेले कार्य ही सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन भारतजी शहाणे सर व प्रमोदजी शहाणे सर यांनी केले,
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ शिक्षक मा. विष्णु औंढेकर सर हे होते तर कार्यक्रमासाठी माजी सैनिक मा.शिवाजीराव लोलगे, जेष्ठ शिक्षक मा. भास्करराव टाक, जेष्ठ समाज सेवक इंजि. गोविंदराव अंबिलवादे, सराफ असोसिएशन उपाध्यक्ष अशोकराव डहाळे, संस्थान अध्यक्ष दिनेशजी डहाळे, सामाज सेविका सौ.अंबिकाताई डहाळे, अदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, कार्यक्रमात विविध क्षेत्रातील शिक्षक व शिक्षिकांनी आपले मनोगत व्यक्त केले, यात गरजुवंत विद्यार्थ्याना शालेय साहित्याची मदत करणे,सर्व शिक्षकांमार्फत उच्च शिक्षणासाठी मदत करणे व समाजातील सर्व शिक्षकांनी एकत्रित येवुन वेळोवेळी समाज बांधवांना प्रबोधन करणे आदी विषयांवर सखोल चर्चा करुन आपले मनोगत व्यक्त केले.
या नंतर सर्व शिक्षकांना सेवा नरहरींची यांच्या वतिने पुष्पगुछ, भेट वस्तू व सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीते करिता सेवा नरहरींची या उपक्रमातील, संतोष ज्ञा.शहाणे , अमोल कुलथे (पांगरकर), बालु डहाळे, गणेश जडे, अमोल टेहरे, संदिप कुलथे (पांगरकर), संजय बोकण, कैलास शहाणे, बाळासाहेब रोडे, अतुल काटकर, सचिन शहाणे, अशोक टाक, अशोक डहाळे, सौ. सारिका शहाणे, सौ. स्नेहा कुलथे (पांगरकर), सौ. संगीता टेहरे, सौ. शुभांगी डहाळे, सौ. तेजेस्विनी कुलथे (पांगरकर) अदिनी परिश्रम घेतले, कार्यक्रमात सर्व शाखीय सोनार समाजातील शिक्षक शिक्षिका तसेच समाज बंधु व भगिनी बहु संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने झाली..
सेवा नरहरींची...🚩
एक निस्वार्थी सामाजिक उपक्रम...
Santosh Gyan. Shahane, Amol Kulthe (Pangarkar), Balu Dahale, Ganesh Jade, Amol Terhe, Sandeep Kulthe (Pangarkar), Sanjay Boken, Kailas Shahane, Balasaheb Rode, Atul Katkar, Sachin Shahane, Ashok Tak, Ashok Dahale, Sarika Shahane, Sou. Sneha Kotha (Pangarkar), hundred Sangeeta Taher, Hundred Shubhangi Dahale, hundred. Tejaswini Kulthe (Pangarkar) took part in the work, attended the program, teachers and teachers of all the branch schools of Sonar community as well as social workers and sisters were present.
Comments
Post a Comment