Sant narhari maharaj harihar sakshatkar

नरहरी महाराजांचा हरी-हर साक्षात्कार

परब्रह्म विठ्ठल पांडुरंग आणि परमात्मा महादेव हे एकच असल्याची प्रचिती

नरहरी महाराज शिवभक्त असले तरी दुस-या देवावर त्यांची फारशी श्रध्दा नव्हती यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे. एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरविले. 
तेव्हाच गावात एका सावकाराला पुत्र झाला तेव्हा पांडूरंगला कमरेची सोन साखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. विठ्ठलाला नवस केल्यामुळे त्याला पुत्ररत्न झाले होते. 
संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास सांगितले. पण संत नरहरी सोनार ह्यांनी स्पष्टपणे नकार दिला याचे कारण त्यांचा पण होता की शंकाराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाहीत.
त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले. 
यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला. दुस-या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले.
संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला.
मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोन साखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले.
संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाने करून दिले. 
परंतु विठठलाला साखली घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले.
माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. 
स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व सोन साखळी कमरेत घालू लागले तर त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणविले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. 
पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहे. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडूरंगला म्हणाले

देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।। 
संदर्भ - devatuzamisonar.blogspot.in

!! श्री नरहरी अच्युतराव उदावंत (पांचाळ) !! नरहरी महाराजांचा जन्मच हरी हराचा वाद मिटविण्यासाठी झाला. मात्र त्यांच्या जन्मानंतर ही *आपली पिढी मात्र आजुनही वाद मिटवु शकली नाही.* त्यांचे चरित्र ज्या *धुंडीसुत मालु यांनी लिहिले. त्यांनी मालुतारण* या त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या (अप्रकाशित) ग्रंथात *नरहरी महाराजांचे मुळ पुरूष रामचंद्र सदाशिव उदावंत सोनार असे म्हटले आहे.* या शब्दावरुन व उपनावा वरुन ते लाड होते असे म्हणता येईल तसेच *भक्ती कथामृत* या ग्रंथात देखील ते लाड असल्याचे म्हटले आहे. 
*हेमकारक पवित्र रामाजी नाईक l जेणे पुर्ण ब्रम्हा यदुकुलतोलक सख्य अत्यंत अराधीला l* *सुवर्णकार कर मिरत उप्नामज्यांचे उदावंत प्रेमावडीभक्ती लाड म्हणवित पंचगौरी जाणत l रामाजी नाईक याती सोनार परीश्रीहरीचा परमप्रियकर l पुढे भक्त नरहरी सोनार तथा वंशी जानत ll२९ll* 
संदर्भ - हरितारण ग्रंथ

Comments